Lapas attēli
PDF
ePub

THE LIFE AND ADVENTURES

OF

ROBINSON CRUSOE

TRANSLATED INTO MARÁTHÍ

BY

RAWJÍ SHÁSTRÍ GODBOLE

MARÁTHÍ TRANSLATION EXHIBITIONER

(NOW REVISER TO THE DAKSHINÁ PRIZE COMMITTEE )

PART I.

PUBLISHED BY ORDER OF THE DIRECTOR OF PUBLIC INSTRUCTION

(Registered under Government of India's Act XXV. of 1867)

BOMBA Y:

GOVERNMENT CENTRAL BOOK DEPOT.

1871.

BOMBAY.

PRINTED AT GANPAT CRISHAJI'S PRESS

BY NARO KRISHNA DUNALE BY ORDER OF THE EXECUTORS.

राबिन्सन क्रूसो त्याचें चरित्र.

भाग पहिला

इंग्रजी मूळ पुस्तकाचें हें भाषांतर

रावजी शास्त्री गोडबोले

मराठी त्रान्स्लेशन एक्सिबिशनर

(हल्लीं दक्षिणा मैज कमिटीचे रिवैजर )

ह्यांनी केले

तें

मेहेरबान दैरेक्तर आफू पब्लिक इन्स्त्रक्शन ह्यांच्या हुकुमावरून छापून प्रसिद्ध केलें.

ह्या पुस्तकाची मालकी सन १८६७ चा आक्त २५ प्रमाणें नोंदिली आहे.

मुंबई.

गवर्नमेन्ट सेन्ट्रल बुक डिपो.

सन १८७१.

मुंबईत.

गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यांत एग्झिक्युटर्स ह्यांच्या हुकुमावरून

नारीकृष्ण दुमाळे ह्यांनीं छापिला.

प्रस्तावना.

[ocr errors]

-

राबिन्सन क्रूसो ह्याचें चरित्र हें एका इंग्रेजी पुस्तकाचें भाषांतर आहे.. इंग्रेजी पुस्तकांतील गोष्ट कल्पित आहे. तरी तिला कांहीं आ धार आहे असें म्हणतात. तो असा. अलेक्जांदर सेलकर्क नांवाचा एक दर्यावर्दी होता, तो स्कातूलंद देशांत इ० स० १६८० झा सुमारास जन्मला. त्यानें समुद्रावर अनेक पर्यटनें केली; त्यांपैकी एका पर्यटनाचे वेळेस त्याचें व त्याच्या जहाजावरील कप्मानाचें वांकडें पडलें. त्यामुळें त्या कप्तानानें त्याला जुंवा फर्नादेज ह्या नांवाच्या बेटावर नेऊन साडिलें. त्या वेळेस त्याजपाशीं एक बंदूक, कांहीं दारू गोळी, छरे, व कांहीं किरकोळ सामान न्याने ठविलें. हा मनुष्य त्या बेटावर सुमारे तीन वर्षे एकटा राहिला. मग सन १७०९ या वर्षी दुसन्या एका गलबतावरच्या कप्तानानें त्याला तेथून नेऊन मुक्त केलें. हा दर्यावर्दी इंग्लंदास गेल्यावर त्यानें आपला वृत्तांत दानियल दी को नामक ग्रंथकार ह्यास कळविला. त्याच गोष्टीच्या आधारावरून दानियल दी फो ह्यानें राबिन्सन् क्रूसो ह्याची गोष्ट कल्पून लिहिली.

राबिन्सन् क्रूसो नांवाचा मनुष्य त्यानें असा कल्पिला कीं, तो स्वभावानें अत्यंत साहसप्रिय होता. त्यानें आपल्या मातापितरांच्या सदुपदेशाकडे दुर्लक्ष्य करून अंतःकरणास रुचलीं तशीं समुद्रपर्यटनें केली. त्यांत त्यावर भयंकर संकटें गुदरली; तथापि तो धैर्यवान्, उद्योगी, व दृढनिश्चयाचा असल्यामुळे न्यास अनेक युक्ति सुचून तो त्या संकटांपासून मुक्त झाला. हा ह्या गोष्टीचा मुख्य विषय आहे.

मनुष्यास कशींही संकटें प्राप्त झालीं तथापि धैर्य न सोडितां ईश्वरावर आपला भार ठेवून त्यां पासून मुक्त होण्याविषयीं तो मनापासून झटेल तर परम दयाळू ईश्वर त्याचें रक्षण खचित करील. हे झा गोष्टीचें मुख्य तात्पर्य होय.

ही गोष्ट अत्यंत सुरस व सदुपदेशपर असल्यामुळे इंग्रेजलोक व ई

« iepriekšējāTurpināt »